News Flash

आयटम साँग करणारच

दिल्ली बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर देशभरात विविध ठिकाणी होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर चित्रपटांतील ‘आयटम साँग’ची नीट शहानिशा करून त्यात अश्लीलता तसेच स्त्रीदेहाचे अवास्तव

| March 14, 2013 02:09 am

दिल्ली बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर देशभरात विविध ठिकाणी होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर चित्रपटांतील ‘आयटम साँग’ची नीट शहानिशा करून त्यात अश्लीलता तसेच स्त्रीदेहाचे अवास्तव प्रदर्शन मांडले असेल तर अशा गाण्यांसाठी चित्रपटाला ‘ए’ प्रमाणपत्र देण्याचा कडक इशारा सेन्सॉर बोर्डाकडून देण्यात आला होता. त्यामुळे यापुढे प्रत्येक आयटम साँग  बारकाईने पाहून कोणते प्रमाणपत्र द्यायचे याचा गांभीर्याने विचार केला जाणार आहे. परंतु, सेन्सॉरचा हा पवित्रा लक्षात घेऊनही आपण मात्र आपल्याला हवी तशी ‘आयटम साँग’ करणार आणि नाचणार व गाणार असल्याची प्रतिक्रिया अभिनेत्री करिना कपूरने दिली आहे. सेन्सॉर बोर्डाने काहीही ठरविले असले तरी मला नाचणे आणि गाणे आवडते आणि मी करत राहणार. गाणी आणि नृत्य हा हिंदी चित्रपटांचा अविभाज्य आणि महत्त्वाचा भाग असून यापुढेही राहील असे मत करिनाने व्यक्त केले. ‘शीला की जवानी’, ‘फेविकोल से’ यांसारखी गाणी केली जातील तेव्हा तेव्हा प्रेक्षक ती गाणी उचलून धरतील, कारण त्यांना ती आवडतातच, असेही करिना कपूरचे म्हणणे आहे. सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयाचा प्रेक्षकांवर काही परिणाम होईल असे वाटत नाही. आयटम साँग पाहायला प्रेक्षक चित्रपटगृहात जातीलच, अशी आपल्याला खात्री आहे, असेही तिने आवर्जून नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 2:09 am

Web Title: i will do the item song as such i needsays kareena kapoor
टॅग : Bollywood
Next Stories
1 झोपडय़ा पाडण्याचा फार्स!
2 महापौर पुरस्कारांची खिरापत :
3 महापौर पुरस्कारांची खिरापत
Just Now!
X