इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे नागपुरात १२ व १३ जानेवारीला ‘निडॉकॉन-१३’ कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती संघटनेच्या अध्यक्ष डॉ. जयश्री जोशी व सचिव डॉ. तुषार श्रीराव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुखआरोग्य सुधारणे या उद्देशाने ही कार्यशाळा १२ व १३ जानेवारीला अंबाझरी उद्यानाजवळील नैवैद्यम सभागृहात होणार आहे. मुंबईच्या शासकीय दंत महाविद्यालय- रुग्णालयाचे अरल मेडिसिन व रेडिओलॉजी विभाग प्रमुख डॉ. हेमंत उमरजी यांच्या व्याख्यानाने कार्यशाळेस प्रारंभ होईल. ‘लेझर डेंटिस्ट्री’ विषयावर डॉ. अ‍ॅलेक्स मॅथूज, ‘सीबीसीटीचा दंतोपचार पद्धतीत उपयोग’ विषयावर डॉ. अंशुल अग्रवाल, ‘मुख कर्करोगाचे निदान’ विषयावर डॉ. रणजित पाटील, दात तुटणे वा पडण्यामुळे गेलेली चेहऱ्याची शोभा वाढविण्यावर डॉ. दीपक व विमल मेहता, ‘बालकांचा दंतोपचार’ विषयावर डॉ. अब्दुल कादीर, ‘इम्प्लांट एक नवा दृिष्टकोन’ विषयावर डॉ. अभय दातारकर, दुभंगलेले ओठ व टाळू विषयावर डॉ. पुष्पा हजारे तसेच डॉ. प्रतिमा शेनॉय, डॉ. संतोष रवींद्रन, डॉ. हर्ष आर्य, डॉ. दर्शन दक्षिणदास, डॉ. अतुल श्रुंगारपुरे माहिती देणार
आहेत.