25 January 2020

News Flash

राष्ट्रवादीच्या नेत्यांपुढे आज विविध गटांचे शक्तिप्रदर्शन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे येणार असल्याने स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व गट कमालीचे सक्रिय झाले आहेत.

| July 8, 2015 08:01 am

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे येणार असल्याने स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व गट कमालीचे सक्रिय झाले आहेत. त्याचे प्रतिबिंब मंगळवारी झालेल्या दोन स्वतंत्र आंदोलनातून उमटले. त्याच बरोबर उद्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत शहर आणि जिल्हाध्यक्षांची निवड करताना याचे पडसाद दिसून येणार असल्याचे संकेत मिळाले आहे. त्यामुळे या गटातटाच्याच्या राजकारणात शहर आणि जिल्हाध्यक्षपद कोणाकडे जाणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष आणि अध्यक्षपदावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू असताना गटातटाचे राजकारण सुरू आहे. मे महिन्यापासून पक्षाच्या कार्यालयात शहर आणि जिल्हा अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरू असताना अजय पाटील आणि त्यांच्या विरोधात गटातील कार्यकर्त्यांनी शक्तिप्रदर्शन केले त्यामुळे गोंधळ झाला. निवडणुकीसाठी आलेले पक्षाचे निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी आमदार राजेंद्र जैन यांनी हा गोंधळ बघता अध्यक्षपदाचा वाद पक्षश्रेष्ठींकडे सोपविला होता. दरम्यान, अजय पाटील यांनी रमन ठवकर यांचे नाव जाहीर केल्यामुळे त्यावर आक्षेप घेत राज्याचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली होती. त्यावेळी अध्यक्षपदासाठी पाटील गटाचे रमन ठवकर, देशमुख गटाचे अनिल अहिरकर यांच्यासह बजरसिंग परिहार, महेंद्र भांगे व प्रवीण कुंटे यांची नावे समोर आली आहेत. याशिवाय दिलीप पनकुले  हे शहर अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पक्षामध्ये गटातटाचे राजकारण शहरात सुरू असताना अजित पवार उद्या  बुधवारी नागपुरात येणार असल्यामुळे दोन्ही गट शहरातील विविध समस्या घेऊन आपली शक्ती दाखविण्यासाठी सक्रिय झाले आहेत. माजी मंत्री अनिल देशमुख यांचा अजय पाटील यांना विरोध आहे त्यामुळे ते किंवा त्यांच्या गटाचा शहर अध्यक्ष होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहे. अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील नागपुरात येणार असल्यामुळे त्यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन करण्याच्या दृष्टीने दोन्ही गटांनी रणनीती तयार केली असून त्याचाच एक भाग म्हणून पाटील आणि अहिरकर यांच्या गटाने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी धरणे प्रदर्शने केली.

अजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहरातील स्थानिक प्रश्न घेऊन धरणे आंदोलन केले. यावेळी प्रगती पाटील यांच्यासह रमन ठवकर आणि पाटील गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात पाटील गट धरणे आंदोलन करीत असताना दुसरीकडे पक्षाचे युवा नेते सलील देशमुख, ज्येष्ठ नेते वेदप्रकाश आर्य, अनिल अहिरकर आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विशाल खंडाळकर यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकात ओबीसी विद्याथ्यार्ंवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात धरणे आंदोलन केले. संघटनात्मक काम वाढविण्याच्या उद्देशाने पक्षाचे ज्येष्ठ नागपुरात येत असताना एक दिवस आधी पक्षातील दोन गटाने वेगवेगळी आंदोलन करून सक्रिय असल्याचे दाखवून दिले आहे.

 

First Published on July 8, 2015 8:01 am

Web Title: protest in front off ncp
टॅग Ncp,Protest
Next Stories
1 अभ्यागतांसाठी वेळ द्या! आयुक्तांना सरकारचे आदेश
2 भ्रष्टाचाराचा इतिहास बदलण्याच्या भाजपच्या भूमिकेबाबत शंका
3 स्पर्शच्या माध्यमातून रसिकांना  पाच दर्जेदार नाटकांची मेजवानी
Just Now!
X