News Flash

गोशाळेत पकडलेला अजगर निसर्गात मुक्त

नागरदेवळे (ता. नगर) येथील माउली गो आश्रमशाळेत ७ फूट लांबीचा अजगर आढळला. सर्पमित्रांनी त्याला कौशल्याने पकडून वनाधिकाऱ्यांच्या मदतीने पुन्हा निसर्गात मुक्त केले.

| October 1, 2013 01:45 am

गोशाळेत पकडलेला अजगर निसर्गात मुक्त

नागरदेवळे (ता. नगर) येथील माउली गो आश्रमशाळेत ७ फूट लांबीचा अजगर आढळला. सर्पमित्रांनी त्याला कौशल्याने पकडून वनाधिकाऱ्यांच्या मदतीने पुन्हा निसर्गात मुक्त केले. वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अँड सोशल वर्क सोसायटीचे आकाश जाधव यांना शाळेचे अंबादास शिर्के यांनी या अजगराविषयी माहिती दिली. जाधव त्यांचे सहकारी भरत वाकळे, शरद शिंदे, शाहिद पठाण, नवाज शेख, अतुल पाखरे आदींनी अजगरास पकडले. नागरिकांनी कोठेही सर्प आढळल्यास त्यांना मारू नये, त्यासाठी संस्थेशी (मो. ९२०९६४०००६) संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 1:45 am

Web Title: python free in the nature
टॅग : Nature
Next Stories
1 कर्नाटकातील तुरची-बबलेश्वर योजनेतून पाणी देण्यासाठी कर्नाटक शासन राजी
2 दामाजी साखर कारखान्याच्या सभेत गोंधळ; शाब्दिक चकमकी
3 सोलापूर कृषी बाजार समितीची १६०० कोटींची आर्थिक उलाढाल
Just Now!
X