News Flash

आमदार सातव यांच्या प्रयत्नांमुळे हिंगोलीकरांसाठी रेल्वे सुरू

हिंगोलीकरांना रेल्वेसेवा मिळावी अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. आमदार राजीव सातव यांच्या प्रयत्नांमुळे ती पूर्ण झाली. रविवारी रेल्वेमंत्री मल्लीकार्जून खरगे यांनी कुर्ला येथे हिरवी झेंडी

| October 28, 2013 01:51 am

हिंगोलीकरांना रेल्वेसेवा मिळावी अशी अनेक दिवसांपासूनची मागणी होती. आमदार राजीव सातव यांच्या प्रयत्नांमुळे ती पूर्ण झाली. रविवारी रेल्वेमंत्री मल्लीकार्जून खरगे यांनी कुर्ला येथे हिरवी झेंडी दाखवून गाडीचा शुभारंभ केला. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
हिंगोलीकरांची अनेक दिवसांची मुंबईला जाणाऱ्या रेल्वे गाडीची मागणी होती. याकरिता वेळोवेळी आंदोलनेही करण्यात आली. परंतु म्हणावा तितका प्रतिसाद रेल्वे विभागाकडून मिळाला नसून वारंवार दुर्लक्ष करण्यात येत होते. आमदार राजीव सातव यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर रविवारी दुपारी २ वाजता कुर्ला-व्हाया-हिंगोली-अंजनी एक्स्प्रेस रेल्वेगाडीला केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लीकार्जून खरगे यांनी हिरवा बावटा दाखविला. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आ. वर्षां गायकवाड, आ. राजीव सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2013 1:51 am

Web Title: railway start for hingoli due to try of mla sataw
टॅग : Hingoli,Mla,Railway
Next Stories
1 ‘गंगाखेड शुगर्स’ विरुद्ध आज भाकपतर्फे मोर्चा
2 दाभोलकरांच्या कार्यासाठी सरसावले दातृत्वाचे हात!
3 ‘नॅक’तर्फे विद्यापीठाला ‘अ’ मानांकन घोषित
Just Now!
X