News Flash

‘आकाश विज्ञान’ या विषयावर दा. कृ. सोमण यांचे व्याख्यान

वसई येथील न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना आणि डॉ. म. ग. परुळकेर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १८ फेब्रुवारी रोजी ‘आकाश विज्ञान’ या विषयावर

| February 14, 2013 12:34 pm

वसई येथील न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना आणि डॉ. म. ग. परुळकेर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १८ फेब्रुवारी रोजी ‘आकाश विज्ञान’ या विषयावर ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत हे व्याख्यान परुळकेर शाळेचे सभागृह, भास्कर आळी, वसई येथे होणार आहे.  
कार्यक्रम विनामूल्य असून लोकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी विद्यार्थी महासंघाचे सचिव चिन्मय गवाणकर यांनी केले आहे. या कार्यक्रमानंतर याच ठिकाणी रात्री आडेआठ ते अकरा या वेळेत सोमण यांच्या मार्गदर्शनाखाली टेलिस्कोपमधून प्रत्यक्ष आकाश दर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश मर्यादित असून इच्छुकांनी नावनोंदणी अभ्यंकर आणि मंडळी यांचे पुस्तकांचे दुकान, पारनाका, वसई येथे येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत करावी. अधिक माहितीसाठी प्रा. महेश अभ्यंकर-९८९००७६१३८/कौस्तुभ राऊत-९५९४०९४०४१ यांच्याशी संपर्क साधावा.

.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 12:34 pm

Web Title: speech on sky science subject by soman sir
Next Stories
1 लोकमान्यतेने वाढतोय माघी गणेशोत्सवाचा माहोल.!
2 ठाण्यातील विस्तारित स्थानकाला अनास्थेचा खोळंबा
3 नव्या मालमत्ता करास यंदाही केराची टोपली
Just Now!
X