डोंबिवलीतील भाजप उमेदवाराची निवडणूक दिवसेंदिवस चुरशीची होत असताना विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपचे नगरसेवक व उपमहापौर राहुल दामले यांनी सोमवारी तडकाफडकी दोन्ही पदांचा प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा पाठवल्याने खळबळ उडाली आहे.
‘निवडणूक कामासाठी आपणास पक्षातून विचारले जात नाही. वाळीत टाकल्यासारखी आपली अवस्था केली आहे. आत्मसन्मान मिळत नाही. स्थानिक पातळीवर पक्षात होत असलेली ही घुसमट सहन होण्यापलीकडची असल्याने राजीनामा दिला आहे,’ असे राहुल दामले यांनी सांगितले.
दरम्यान, या घुसमटीला कंटाळून मंगळवारी डोंबिवली पश्चिमेतील भाजपची एक नगरसेविका व तिचा पती पदांचे राजीनामे देणार असल्याचे बोलले जाते. या दाम्पत्याच्या समर्थकांनी ही माहिती दिली. भाजपची डोंबिवलीतील परिस्थिती दिवसेंदिवस तोळामासाची होत असताना अचानक भाजपमध्ये पडझड सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
डोंबिवलीत भाजपतर्फे रवींद्र चव्हाण विधानसभा निवडणूक लढवीत आहेत. चव्हाण यांनी भाजपबरोबर स्वत:ची पक्षयंत्रणा शहरात विकसित केली आहे. त्यामुळे पक्षातील जे बरोबर येतील ते त्यांना घेऊन नाही आले तर त्यांना सोडचिठ्ठी देऊन ते स्वत:चा प्रचार करीत आहेत. राहुल दामले डोंबिवलीतील पेंडसेनगर प्रभागाचे नगरसेवक आहेत. ते उपमहापौर आहेत. दामले यांच्या पेंडसेनगर प्रभागात चव्हाण यांच्या प्रचाराचे काम सुरू आहे. आपण स्थानिक नगरसेवक असूनही प्रभागात बैठका आणि प्रचारकार्य सुरू असताना आपणास विचारले जात नाही. म्हणून दामले यांनी चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना विचारणा केली. विषय तेथे संपला होता. त्यानंतर उमेदवार रवींद्र चव्हाण यांनी दामले यांच्याशी संपर्क करून ‘मी प्रचार करतो. तुम्हाला काय त्रास’ असे प्रश्न विचारून त्यांचा अपमान केला, अशी माहिती दामले समर्थकांकडून मिळाली. अशा प्रकारे स्थानिक नेतृत्वाकडून पदाधिकाऱ्याचा आत्मसन्मान राखण्यात येत नसेल तेथे कार्यकर्त्यांची काय किंमत. मग पक्षात राहून उपयोग काय असा प्रश्न दामले यांनी केला. दामले यांनी तडकाफडकी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. पक्षनेते याविषयी दामले यांच्याशी बोलणार आहेत, असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. चव्हाण समर्थकांनी मात्र हा विषय नाहक वाढवण्यात आला. विषय फक्त प्रचारापुरता मर्यादित आहे. बाकी काही बाचाबाची, वाद झाला नसल्याचे सांगितले.  
भाजप नगरसेविका अर्चना कोठावदे, नगरसेवक बुधाराम सरनोबत आणि आता राहुल दामले पक्षावर नाराज आहेत. नाराजीच्या मुळाचा शोध घेण्याऐवजी भाजप प्रदेश नेते फडणवीस, विनोद तावडे, एकनाथ खडसे फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

dharashiv lok sabha marathi news, dharashiv 31 candidates lok sabha
धाराशिव: चार उमेदवारांची माघार, मतदारसंघात पहिल्यांदा सर्वाधिक ३१ उमेदवार आखाड्यात
congress leader sonia gandhi choose rajya sabha fear of defeat polls says pm narendra modi
पराभवाच्या भीतीने सोनिया गांधी राज्यसभेवर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका
Loksabha Election 2024 Equal opportunity for Congress-BJP in South Nagpur
रणसंग्राम लोकसभेचा : दक्षिण नागपुरात काँग्रेस-भाजपसाठी समान संधी; जाणून घ्या सविस्तर…
BJP youth leader in contact with Sharad Pawar group for candidacy from Raver
रावेरमधून उमेदवारीसाठी भाजपचा युवानेता शरद पवार गटाच्या गळाला?