केज विधानसभा मतदारसंघातील ३२ गावांमधील विकासकामांसाठी दोन   कोटींचा    निधी   मंजूर झाला.    ग्रामविकास   विभागामार्फत निधी मिळावा, या साठी आमदार धनंजय मुंडे यांनी पाठपुरावा केला.
केज विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार मुंडे यांच्यावर काही गावांच्या प्रचाराची जबाबदारी सोपवली होती. निवडणुकीचा प्रचार करताना आमदार मुंडे यांनी गावातील रस्ते, सामाजिक सभागृह विकासकामासाठी निधी देण्याचे आश्वासन    दिले    होते. राष्ट्रवादीचे    उमेदवार पृथ्वीराज साठे   या  निवडणुकीत विजयी झाले.
त्यामुळे निवडणूकपूर्वी आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी मुंडे यांनी ६ महिन्यांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला.
मार्च महिन्यातील पुरवणी अर्थसंकल्पात पवार यांनी धनंजय मुंडे यांनी सुचवलेल्या केज मतदारसंघातील ३२ गावातील कामांसाठी २ कोटींच्या निधीची विशेष तरतूद केली.