नीरा नदीत बुडून दोघांचा मृत्यू

पोहता येत नसताना पोहण्यास गेलेल्या दोघांचा नीरा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास राऊतनगर (अकलूज) नजीक घडला.

पोहता येत नसताना पोहण्यास गेलेल्या दोघांचा नीरा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. हा प्रकार आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास राऊतनगर (अकलूज) नजीक घडला.
असगर निसार ईराणी वय १४ व सोनू उर्फ महेश चौगुले वय १४ हे अकलूज येथील अकलाई विद्यामंदिरात इयत्ता ९ वीमध्ये शिकत होते. शाळेला गांधी जयंतीची सुट्टी असल्याने हे दोघे इतर मित्रांसमवेत जवळच असणाऱ्या नीरा नदीत पोहण्यास गेले होते. या दोघांनाही पोहता येत नसताना पात्रात उतरल्याने ते गाळात रुतत गेले व त्यातच त्यांचा अंत झाला. इतर मित्रांनी आरडाओरडा केला. मात्र उपयोग झाला नाही. अकलूज पोलिसात अकस्मात निधनाची नोंद झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 2 died from drowning in water

ताज्या बातम्या