नागपूर आणि मुंबईदरम्यान धावणाऱ्या गाडय़ांना गर्दी वाढल्याने रेल्वे दोन सुपरफास्ट विशेष गाडय़ा सोडणार आहे. ही विशेष गाडी येत्या बुधवारीच्या रात्री मुंबईहून आणि गुरुवारी दुपारी नागपूहून सुटेल. गाडी क्रमांक ०१०१३ ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर एक्स्प्रेस मुंबईहून बुधवारला मध्यरात्री १२.२० वाजता निघेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी नागपुरात दुपारी ३ वाजता येईल.
गाडी क्रमांक ०१०१४ नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी नागपूरहून गुरुवारी रात्री सव्वा नऊ वाजता निघेल. ही गाडी मुंबईला दुसऱ्या दिवशी दुपारी १.२० वाजता पोहोचेल. या गाडीला बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा येथे थांबे राहणार आहेत. ही गाडी २३ डब्यांची आहे. त्यात एक डबा प्रथम आणि द्वितीय श्रेणी वातानुकूलित, एक डबा द्वितीय श्रेणी वातानुकूलित, तीन डबे तृतीय श्रेणी वातानुकूलित, १२ डबे शयनयान, पाच डबे समान्य आणि दोन एसएलआर राहणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 17th Feb 2015 रोजी प्रकाशित
नागपूर-मुंबईदरम्यान दोन सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडय़ा
नागपूर आणि मुंबईदरम्यान धावणाऱ्या गाडय़ांना गर्दी वाढल्याने रेल्वे दोन सुपरफास्ट विशेष गाडय़ा सोडणार आहे.
First published on: 17-02-2015 at 07:07 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 special suparfast railway for nagpur mumbai