नवी मुंबई शहराची निर्मितीच मुळात ९५ गावांतील ग्रामस्थांच्या जमिनीवर झाली आहे. त्यातील २९ गावे ही पालिका क्षेत्रातील आहेत. या गावांतील प्रकल्पग्रस्तांचे वर्चस्व नवीन सभागृहात कायम राहणार आहे. १११ प्रभागांच्या सभागृहात ५७ नगरसेवक हे प्रकल्पग्रस्त आहेत. सभागृहात बहुमताची संख्या ५६ आहे. हे या ठिकाणी विशेष नोंद करण्यासारखे आहे. २९ गावांसाठी या वेळी २९ प्रभाग निर्माण झाले होते. त्यापेक्षा शहरी भागावरही आपले वर्चस्व कायम ठेवणाऱ्या २८ प्रकल्पग्रस्त नगरसेवक हे शहरी भागातून निवडून आले आहेत.
नवी मुंबईची स्थापना जानेवारी १९९२ रोजी झाली. त्यानंतर एप्रिल १९९५ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीसाठी ५७ प्रभागांची रचना करण्यात आली होती. नेमकी तीच संख्या या वेळी निवडून आलेल्या प्रकल्पग्रस्त नगरसेवकांची आहे.
प्रकल्पग्रस्त नगरसेवक
प्रकल्पग्रस्त नगरसेवकांमध्ये शुभांगी गवते, दीपा गवते, नवीन गवते, जगदीश गवते, अ‍ॅड. अपर्णा गवते हे पाच गवते दिघा परिसरातील जमिनीचे मालक मानले जातात. सिडकोने त्यांची जमीन संपादित केली नसली तरी एमआयडीसीने काही जमीन घेतलेली आहे. यानंतर शशिकला सुतार,आकाश मढवी, विनया मढवी, विजया मढवी, करण मढवी (एकाच घरातील तीन जण निवडून येणारे हे एकमेव कुटुंब) चेतन नाईक, मंदाकिनी म्हात्रे, लक्ष्मीकांत पाटील, मोनिका पाटील, निवृत्ती जगताप, द्वारकानाथ भोईर, सीमा गायकवाड, प्रशांत पाटील, उषा पाटील, कमल पाटील, सुवर्णा पाटील, अनिता पाटील, शिवराम पाटील, छाया म्हात्रे, संगीता म्हात्रे, लता मढवी, मनीषा भोईर, प्रज्ञा भोईर, फशीबाई भगत, रामचंद्र घरत, शशिकला पाटील, सोमनाथ वास्कर, कोमल वास्कर, शुभांगी पाटील, वैजंयती भगत, रूपाली भगत, जयवंत सुतार, तुनजा मढवी, सुजाता पाटील, जयश्री ठाकूर, ज्ञानेश्वर सुतार, मीरा पाटील,  सुनील पाटील, नामदेव भगत, गिरीश म्हात्रे, रूपाली किस्मत भगत, सलुजा सुतार, सरोज पाटील, भारती कोळी, पूनम पाटील, विनोद म्हात्रे, गणेश म्हात्रे  यांचा समावेश आहे.