यवतमाळ जिल्ह्य़ात वरुण राजाच्या कृपेमुळे मार्च आणि एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धापर्यंत तरी पाणीटंचाई अजिबात जाणवणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल आणि जिल्हा परिषदेचे सी.ई.ओ. नवलकिशोर राम यांनी केले असे असले तरी एप्रिलच्या उत्तर्धापासून पाणीटंचाई इतकी तीव्र भासणार आहे की, त्यासाठी आज नियोजन केले नाही तर हाहाकार उडल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्य़ातील १६ तालुक्यातील ८६२ गावांमध्ये एप्रिल ते जून या काळात पाणीटंचाई तीव्रतेने जाणवणार आहे.
यावर्षी जिल्ह्य़ात वरुण राजाच्या कृपेने अरुणावती, अडाण, बेंबळा उध्र्व पनगंगा यासारखे मोठे सिंचन प्रकल्प आणि शंभरावर असलेले मध्यम लघु सिंचन प्रकल्प ९० ते १०० टक्के भरले होते. यवतमाळ शहराला आणि एमआयडीसी परिसराला पाणीपुरवठा करणारे चापडोह, निळोणा आणि अडाण प्रकल्प यंदा ओव्हरफ्लो झालेले पाहण्याचे भागय जनतेला लाभले. यवतमाळकरांना सातही दिवस २४ तास पाणी पुरवठा करण्याचे मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही यवतमाळकरांना चापडोह आणि निळोणा या दोन धरणातून एक दिवसा आड, तो देखील तीन चार तास पाणीपुरवठा केला जातो. यवतमाळकरांना गेल्या ४२  वषार्ंपासून हीच सवय झालेली आह. उल्लेखनीय म्हणजे, आज एकाही गावात टँकरची मागणी नाही किंवा बलबंडीने पाणीपुरवठा करण्याची अवस्था नाही, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
आज जरी जिल्ह्य़ात पाणीटंचाई भासत नसली तरी, घर बांधकामासाठी, बगिच्यांसाठी, पोहण्याच्या तलावासाठी, मोटारगाडय़ा धुण्यासाठी पिण्याच्या सर्रास वापर होत असला आणि पाण्यासारखे पाणी वापरले जात असले तरी एप्रिलच्या उत्तर्धापासून निदान जुलच्या पूर्वाधापर्यंत पाणीटंचाई इतकी तीव्र भासणार आहे की, त्यासाठी आज नियोजन केले नाही तर हाहकार उडल्याशिवाय राहणार नाही. यवतमाळ, उमरसरा, वडगाव, लोहारा, िपपळगाव, मोहा, वाघापूर, गोदणी इत्यादी गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या चापडोह आणि निळोणा धरणात होत असलेले पाण्याचे बाष्पीभवन लक्षात  घेता पाणीटंचाई तीव्र होणार आहे. विशेषत पांढरकवडा, वणी, झरी झामणी, घाटंजी,  मारेगाव, दारव्हा, या तालुक्यात भूगर्भातील पाणी पातळी खालावणार आहे, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा गोषवारा सरकारला सादर केल्याची माहिती जि.प. चे कार्यकारी अभियंता के.टी उमाळकर यांनी दिली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने भविष्यातील पाणी टंचाईची तीव्रता शासनाच्या लक्षात आणू दिली आहे.
जिल्ह्य़ातील यवतमाळ, बाभुळगाव, कळंब, वणी, राळेगाव, मारेगाव, घाटंजी, केळापूर, पुसद, दारव्हा, दिग्रस, उमरखेड, महागाव, झरीझामणी, नेर, इत्यादी १६ तालुक्यातील ८६२ गावांमध्ये भविष्यात म्हणजे एप्रिल ते जून  या काळात पाणीटंचाई तीव्रतेने जाणवणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. सध्या  शासनाकडून साडेतीन कोटी रुपये जिल्ह्य़ाला प्राप्त झाले असले तरी पाणीटंचाई अंतर्गत या रकमेपकी एक रुपयासुध्दा खर्च करण्यात आलेला नाही. तशी आवश्यकताच भासलेली नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या पाणीटंचाई आढावा बठकीत सांगण्यात आले.
याचाच अर्थ, आता फक्त ९२ लाख रुपये जर शासनाने पाठवले तर आधीच शिल्लक असलेल्या तीन कोटी ३६ लाख रुपयांमध्ये ही रक्कम मिळवून भविष्यातील पाणीटंचाईचा सामना समर्थपणे करण्याचा विश्वास आढावा बठकीत व्यक्त करण्यात आला.