सीएसी-ऑलराऊंडर आणि वायुसेना मेंटेनन्स कमांडच्या संयुक्त विद्यमाने रामटेक येथे आयोजित वायुसेनेतील सैनिकांच्या साहसी शिबिराचा समारोप नुकताच झाला. या शिबिराचे उद्घाटन एअर मार्शल चंद्रा आणि एअर व्हाईस मार्शल जे.एस. क्लेर यांच्या हस्ते झाले. वायुसेनेतील अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही या शिबिराचा अनुभव घेता आला. शिबिराची सुरुवात तंबू उभारण्यापासून झाली. जंगलभ्रमण व वन्यजीव निरीक्षणाचा अनुभव रोमांचकारी ठरला. शिबिरात पॅरासेलिंग, पॅराग्लायडिंग, निसर्गाशी हितगूज, एकाग्रता वाढविणे, संघटन कौशल्य यासारख्या हवाई खेळांच्या माध्यमातून मानसिक ताण कमी करणे व कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने शिबीर आयोजित करण्यात आले. शिबिरात ग्रुप कॅप्टन टी.एस. बाबू, विंग कमांडर वेणुगोपाल यांनी वायुसैनिकांचा उत्साह वाढविला. शिबिरासाठी सीएसी-ऑलराऊंडरचे संचालक अमोल खंते, गजानन रिंढे, अजय गायकवाड, मनीष मख, भवन पटेल, दिनेश इवनाते आणि बेसिक अ‍ॅडव्हेंचर  ट्रेनिंग स्कूलचे प्रशिक्षकांनी सहकार्य केले.