भ्रष्टाचारविरहित, सर्वगुणसंपन्न, अभ्यासू आणि जनतेशी जवळीक असणाऱ्या उमेदवाराला मतदान करून लोकशाही जिवंत ठेवण्याचे आवाहन नाशिक परिसर वृत्तपत्र लेखक संघटनेच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे आयोजित ‘लोकसभेच्या निवडणुकीत नागरिकांचा सहभाग आणि अपेक्षा’ या चर्चासत्रातून मान्यवरांनी केले.
मतदान लोकशाही व्यवस्थेत महत्वपूर्ण असल्याने मतदानाच्या दिवशी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क हमखास बजवावा असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक पां. भा. करंजकर यांनी केले. या चर्चासत्रात प्रा. यशवंत पाटील, स्वातंत्र्यसैनिक वसंत हुदलीकर, प्रा. सुमन मुठे, जयश्री चव्हाण, ए. जी. शिरसाठ, सुरेश भोर आदिंनी सहभाग घेतला. प्रास्तविक व सूत्रसंचालन वृत्तपत्र लेखक संघटनेचे अध्यक्ष रमेश कडलग यांनी केले. सुरेश बागूल यांनी आभार मानले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Apr 2014 रोजी प्रकाशित
भ्रष्टाचारविरहित उमेदवारास मतदान करण्याचे आवाहन
भ्रष्टाचारविरहित, सर्वगुणसंपन्न, अभ्यासू आणि जनतेशी जवळीक असणाऱ्या उमेदवाराला मतदान करून लोकशाही जिवंत ठेवण्याचे आवाहन नाशिक परिसर वृत्तपत्र लेखक संघटनेच्या वतीने हुतात्मा स्मारक
First published on: 15-04-2014 at 07:28 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appeal to vote for uncorrupted candidate