हुपरी येथील स्वातंत्र्यसेनानी बाबा तथा एल. वाय. पाटील प्रतिष्ठानचा पुरस्कार बी न्यूजचे इचलकरंजी प्रतिनिधी संजय कुडाळकर यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अकरा मान्यवरांना जाहीर झाला आहे. प्रतिवर्षी हुपरी येथील पाटील प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना विशेष पुरस्काराने सन्मानीत करण्यात येतो. या वर्षीचे ११ पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुरस्कारप्राप्त व्यक्तींमध्ये श्रीमती शिवाक्का बाबू साळुंखे (रा. माणगाव, ता. चंदगड), लालासाहेब नाईक (जिल्हाध्यक्ष दलित महासंघ), पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत, राजश्री औधकर (कोल्हापूर), डॉ. एस.आर. पाटील, दादासाहेब मोरबाळे, विनोदकुमार खोत (हुपरी), संजय कुडाळकर, वैशाली नायकवडे, विठ्ठल परबकर (इचलकरंजी), नारायण सारंगकर (रा. राजुरी, जि. सोलापुर), विलासराव पोवार (रेंदाळ) प्रकाश यादव (पुणे) आणि अशोकराव माळी ( रा. खोची ता. हातकणंगले) या मान्यवरांचा समावेश आहे.