सूर्यपुत्र भय्यासाहेब ऊर्फ यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने भय्यासाहेब आंबेडकर जन्मशताब्दीनिमित्त चार दिवसीय महोत्सवाचे आयोजन केले आहे. रविवारी (दि. ९) सायंकाळी ५ वाजता क्रांती चौक ते भडकल गेट दरम्यान रॅली काढण्यात येणार आहे. सोमवारी (दि. १०) ‘भय्यासाहेब आंबेडकर व आंबेडकरी राजकारण’ या विषयावर ज. वि. पवार व डॉ. अरुणा लोखंडे यांचे व्याख्यान होणार आहे. अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. क्षीरसागर, तर नगरसेवक मिलिंद दाभाडे, प्रा. विजयकुमार गवई, एस. आर. सरदार, रमेश बनसोड या वेळी उपस्थित राहतील. मंगळवारी (दि. ११) ‘भय्यासाहेब आंबेडकर व धम्मक्रांती’ या विषयावर भीमराव तायडे, डॉ. संजय मून व प्रा. सुशीला मुलजाधव यांचे व्याख्यान होईल. अध्यक्षस्थानी प्राचार्य ल. बा. रायमाने, तर नगरसेवक अमित भुईगळ, अॅड. एस. आर. बोदडे उपस्थित असतील. बुधवारी (दि. १२) ‘भय्यासाहेब आंबेडकर-खरा आंबेडकरी वारसा’ या विषयावर प्रा. प्रकाश जंजाळ, डॉ. ऋषिकेश कांबळे, शंकरराव हातोले यांचे व्याख्यान होणार आहेत. अध्यक्षस्थानी अॅड. बी. एच. गायकवाड, तर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. भारत कदम उपस्थित राहतील. दररोज संध्याकाळी ५ वाजता आमखास मैदान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र येथे ही व्याख्यानमाला होणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Dec 2012 रोजी प्रकाशित
भय्यासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी महोत्सव
सूर्यपुत्र भय्यासाहेब ऊर्फ यशवंतराव आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने भय्यासाहेब आंबेडकर जन्मशताब्दीनिमित्त चार दिवसीय महोत्सवाचे आयोजन केले आहे. रविवारी (दि. ९) सायंकाळी ५ वाजता क्रांती चौक ते भडकल गेट दरम्यान रॅली काढण्यात येणार आहे.
First published on: 09-12-2012 at 03:21 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birth anniversary festival of bhaiyasaheb ambedkar