अखिल भारतीय मराठा महासंघाने संपूर्ण समाजासाठी विधायक कार्य हाती घ्यावे. महाराष्ट्रात राहतो तो मराठा समाज, ही व्यापक भूमिका तळागळात पोहोचवावी असे आवाहन पालकमंत्री राजराजे निंबाळकर यांनी केले. मराठा महासंघाच्या दिनदर्शिका प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पवार, आमदार प्रभाकर घार्गे उपस्थित होते. मराठा आरक्षण मिळण्यासाठी मंत्रिमंडळ पातळीवर पाठिंबा मिळावा, अशी मागणी बाळासाहेब पवार यांनी केली. यावेळी धनंजय पवार, गणेश पवार, तुषार पाटील, अनिल देशमुख, रोहित काटकर, प्रतीक कणसे आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.