शहरावर जलसंकट कोसळले असतानाच महापालिकेच्या रूपाभवानी मंदिराजवळील पाणीपुरवठा शुध्दीकरण केंद्रात (पाणी गिरणी) जलवाहिनी फुटून लाखो लिटर्स पाणी वाया जात असल्याने व त्याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त तरूणांच्या जमावाने पाणी गिरणीवर हल्लाबोल केला होता. यात कार्यालयातील मोडतोड झाली होती. याप्रकरणी अज्ञात १५ते २० अज्ञात व्यक्तींविरूध्द अखेर पोलिसात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पालिकेचे कर्मचारी रवींद्र महादेव गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १५ ते २० अज्ञात व्यक्तींच्या जमावाने पाणी गिरणीत अनाधिकाराने घुसून रासायनिक प्रयोगशाळेसह स्टोअर रूमच्या काचा फोडल्या. तसेच दूरध्वनी यंत्रणा तोडली. यात हजारो रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.