ज्ञानप्रबोधिनीच्या डोंबिवली केंद्रातर्फे रविवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता टिळकनगर येथील टिळक विद्यामंदिरात पाचवी आणि सहावीमधील विद्यार्थ्यांसाठी संवाद सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धकांनी दिलेल्या विषयावर संहिता (स्क्रिप्ट) लिहून त्यावर ५ ते ८ मिनिटे जोडीने संवाद सादर करायचा आहे. प्रथम क्रमांकाच्या जोडीला २८ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या कुमार संमेलनात प्रयोग सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- श्रुती फाटक ९९३०१०२९९८. ज्योती कर्वे ९९६९६१५८४७.