राज्यातील पाच जिल्ह्य़ांचा समावेश
रब्बी हंगामातील पिकांच्या विमा योजनेत सुधारणा करण्यात आली असून राज्यातील पाच जिल्ह्य़ांत हवामानाधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. यामध्ये विदर्भातील नागपूर व अमरावती या दोन जिल्ह्य़ांचा समावेश आहे.
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा, करडई, सूर्यफूल  आणि उन्हाळी हंगामातील भुईमूग व धान या आठ पिकांसाठी विमा योजना राज्य सरकारने लागू केली आहे. पिकांचे किमान २० टक्के नुकसान भरपाईस पात्र राहणार आहे. नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीस वैयक्तिक पातळीवर भरपाई मिळणार आहे. भारतीय विमा कंपनीमार्फत मंडळस्तरावत ही योजना राबविण्यात येणार आहे.
विदर्भातील अमरावती व नागपूर जिल्ह्य़ांतील गहू व हरभरा या पिकांसाठी तर सोलापूर (ज्वारी, गहू), अमहमदनगर (ज्वारी, हरभरा), उस्मानाबाद (ज्वारी, हरभहरा) जिल्ह्य़ांसाठी हवामानाधारित विमा योजना राबविण्यात येणार आहे. या  योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत गहू व हरभरा या पिकांसाठी १५ ऑक्टोबपर्यंत आहे. पीक कर्ज असलेल्या शेतक ऱ्यांसाठी ही योजना बंधनकारक करण्यात आली असून उर्वरित शेतक ऱ्यांना ऐच्छिक आहे. विमा कालावधी संपल्यानंतर दीड महिन्यात भरपाईची रक्कम शेतक ऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. हरभरा, गहू व ज्वारी पिकांचा सर्वसाधारण जोखीमस्तर ६० वरून ८० टक्क्यांपर्यत वाढविण्यात आला आहे. २० टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान होणारे क्षेत्र भरपाईस पात्र ठरेल. सूर्यफूल व करडई पिकांचे ४० टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान भरपाईस पात्र आहे. अल्प व अत्यल्पभूधारकांना १० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. सर्व जिल्ह्य़ांमध्ये पिकांसाठी विमा उतरविण्याची अंतिम मुदत पेरणीपासून एक महिना किंवा ३१ डिसेंबर यापैकी आधी असेल ती राहील. उन्हाळी भुईमूग आणि धानासाठी पेरणीनंतर एक महिना किंवा ३१ मार्च यापैकी आधी असेल ती राहील. हवामान आधारिक विमा योजनेत पिकांना संरक्षण मिळणार आहे. शेतकऱ्यांना गव्हासाठी हेक्टरी ३७५ रुपये विमा हप्ता भरावा लागणार असून २५ हजारांचे विमा संरक्षण मिळणार आहे. अति तापमानामुळे नुकसान झाल्यास १० हजार रुपये, अवेळी किंवा अति पाऊस झाल्यास १० हजार रुपये तर रोपाला अनुकूल हवामान नसल्यास ५ हजार रुपये भरपाई मिळणार आहे. रब्बी विमा योजनेतील सुधारणांचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.