महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराला आळा बसविण्यात यावा; तसेच रस्ते, पाणी, आरोग्य या संदर्भात नाशिककरांना योग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, अशी मागणी समाजवादी पक्षाच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महानगरपालिकेकडून प्रत्येक करदात्याला मूलभूत सुविधा द्याव्यात, पालिकेतील प्रथम ते तृतीयश्रेणी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासनाच्या नियमानुसार आपली संपत्ती जाहीर करावी, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या पालिकेतील संबंधितांची चौकशी पूर्ण करून दोषींवर कारवाई करावी, हरित नाशिक-सुंदर नाशिक हे केवळ घोषणेपुरते मर्यादित राहू नये, नाशिककरांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, कोटय़वधी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या वैद्यकीय यंत्रसामग्रीचा उपयोग करावा आदी मागण्या पक्षाचे शहराध्यक्ष मसूद जिलानी शेख यांनी केल्या आहेत.