वेगवेगळ्या दोन शासकीय विभागामध्ये समन्वयाच्या अभावामुळे शहराला पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आहे. पाटबंधारे विभागाने सुलवाडे बॅरेजचे दरवाजे उघडल्याने शहराला पुरविले जाणारे पाणी तापी नदीतून गेले. यामुळे सुकवद पंपिंग स्टेशनजवळ पाणी अडविण्यासाठी जेसीबी यंत्राने बांध घालण्याचे काम महापालिकेने युद्धपातळीवर सुरू केले आहे.
सुलवाडे बॅरेजचे दरवाजे बंद करून शहरवासीयांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते संजय गुजराथी यांनी केले आहे. तसे पत्र जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंना पाठविण्यात आले आहे. दरम्यान, सध्या नकाणे तलावातून शहरवासीयांची तहान भागविली जाते आहे. यामुळे एकाच जलस्त्रोतावर ताण पडल्याने किमान सहा दिवसानंतर एकवेळा विविध वसाहतींमध्ये पाणी पुरवठा होत आहे. ऐन पावसाळ्याच्या हंगामात धुळेकरांवर टंचाईचे संकट कोसळले आहे. बांध घालण्याचे काम पूर्णत्वास गेल्यावर टंचाईची तीव्रता काहिशी कमी होईल.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jun 2013 रोजी प्रकाशित
ऐन पावसाळ्यात धुळ्यात टंचाई
वेगवेगळ्या दोन शासकीय विभागामध्ये समन्वयाच्या अभावामुळे शहराला पाणी टंचाईला सामोरे जावे लागले आहे. पाटबंधारे विभागाने सुलवाडे बॅरेजचे दरवाजे उघडल्याने शहराला पुरविले जाणारे पाणी तापी नदीतून गेले. यामुळे सुकवद पंपिंग स्टेशनजवळ पाणी अडविण्यासाठी जेसीबी यंत्राने बांध घालण्याचे काम महापालिकेने युद्धपातळीवर सुरू केले आहे.

First published on: 28-06-2013 at 01:08 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhule suffers with water scarcity in mid rain