येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये युवकांचा सहभाग वाढावा, यासाठी विद्यापीठनिहाय मतदान जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ कार्यक्षेत्राचे कॅम्पस अॅम्बॅसेडर म्हणून कुलसचिव डॉ. धनराज माने यांची निवड करण्यात आली. आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर मतदारांमध्ये जागृती करणे, या उद्देशाने ‘स्वीप २’ या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. १८ व १९ वयोगटांतील महाविद्यालयीन युवकांची नावनोंदणी मोठय़ा प्रमाणावर वाढविण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 19th Aug 2013 रोजी प्रकाशित
कॅम्पस अॅम्बॅसेडरपदी डॉ. माने यांची नियुक्ती
येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये युवकांचा सहभाग वाढावा, यासाठी विद्यापीठनिहाय मतदान जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ कार्यक्षेत्राचे कॅम्पस अॅम्बॅसेडर म्हणून कुलसचिव डॉ. धनराज माने यांची निवड करण्यात आली.

First published on: 19-08-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr mane appointed of campus ambassador