दुबई येथे झालेल्या सीकॉट या जागतिक अस्थिरोग परिषदेमध्ये सांगलीतील अस्थिरोग विशेष तज्ज्ञ डॉ. सुनिल पाटील यांनी दोन शोधनिबंध सादर केले. कोरोनाईड फॅक्चर्स व प्लोटिंग नी इन्शुरीज म्हणजेच हाताचे कोपर व गुडघ्याचे अपघाती फॅक्चर्स हे त्यांच्या शोधनिबंधाचे विषय होते. जगभरातील १५० राष्ट्रांतून ७ हजार अस्थिरोग तज्ज्ञ परिषदेसाठी जमले होते. त्यात डॉ.पाटील यांना भारतातर्फे निबंध सादर करण्याची संधी मिळाली. डॉ. पाटील हे गेली २४ वर्षे सांगली येथे अस्थिरोग शल्यचिकित्सक म्हणून तसेच भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज येथे सहप्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी अमेरिकन अॅकॅडमी, जर्मनी व ऑस्ट्रेलिया येथे शोधनिबंध सादर केले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jan 2013 रोजी प्रकाशित
डॉ. सुनिल पाटील यांचे शोधनिबंध
दुबई येथे झालेल्या सीकॉट या जागतिक अस्थिरोग परिषदेमध्ये सांगलीतील अस्थिरोग विशेष तज्ज्ञ डॉ. सुनिल पाटील यांनी दोन शोधनिबंध सादर केले. कोरोनाईड फॅक्चर्स व प्लोटिंग नी इन्शुरीज म्हणजेच हाताचे कोपर व गुडघ्याचे अपघाती फॅक्चर्स हे त्यांच्या शोधनिबंधाचे विषय होते.
First published on: 05-01-2013 at 09:14 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr sunil patil presented research paper