लातूर शहरात सध्या पाणीटंचाई असल्याने नागरिकांनी कोरडे रंग वापरून व पाण्याचा कमीत कमी वापर करून रंगपंचमी साजरी करावी, असे आवाहन महापौर स्मिता खानापुरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे. रविवारी रंगपंचमीचा सण साजरा करण्यात येणार आहे.
सध्या पाणीटंचाई असल्याने नगरिकांनी कोरडे रंग वापरून रंगपंचमी साजरी करावी. कोरडय़ा रंगांचा वापर केल्याने अंगावरील रंग काढण्यासाठी, रंगाचे कपडे धुण्यासाठी पाण्याचा कमीत कमी वापर होतो. उपलब्ध असलेले पाणी पावसाळ्यापर्यंत पुरविण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापौर खानापुरे यांनी केले आहे.