मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोर उभ्या केलेल्या चार मोटारींची नासधूस करण्याचा प्रकार शाहूपुरीत घडला. तेथील गल्ली नं.२ मध्ये दोन तर गल्ली क्र.४ मध्ये दोन अशा चार वाहनांच्या काचा टोळक्याकडून फोडल्या गेल्या. याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर राहणारे केतन मोहनलाल पटेल व धैर्यशील सूर्याजी देसाई तर दुसऱ्या गल्लीतील स्टेट बँक म्हैसूर समोर राहणारे बाजीराव महादेव पाटील व गिरीश भीमराव पाटील यांच्या मोटारींच्या काचा टोळक्याकडून फोडल्या गेल्या आहेत. यामध्ये सुमारे ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दोन स्विफ्ट, एक इंडिका व एक अॅसेंट कंपनींच्या मोटारीचा समावेश आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jul 2013 रोजी प्रकाशित
कोल्हापुरात चार मोटारींची नासधूस
मध्यरात्रीच्या सुमारास घरासमोर उभ्या केलेल्या चार मोटारींची नासधूस करण्याचा प्रकार शाहूपुरीत घडला. चार वाहनांच्या काचा टोळक्याकडून फोडल्या गेल्या.

First published on: 18-07-2013 at 01:56 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four motors damaged in kolhapur