नि:स्वार्थ सेवेचे मूर्तिमंत उदाहरण स्वाधार केंद्र आहे, असे प्रतिपादन डॉ. विठ्ठल लहाने यांनी जागतिक अपंग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले. बुधोडा येथे स्वाधार अंध, अपंग पुनर्वसन केंद्रात हा कार्यक्रम झाला. संचालक हरिश्चंद्र सुडे, उदय देशपांडे, सुधीर सोळुंके, अमोल चव्हाण, महादेव बरबडे, ओंकार थोंडे, विशाल चौधरी, सुजय बाजपेई आदी उपस्थित होते. केंद्रातील विशेष कामगिरी करणाऱ्या स्वावलंबीचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. नाबार्ड आयोजित ग्रामसंपदा २०१२ या राज्यस्तरीय प्रदर्शनात अ‍ॅक्युप्रेशर मसाजच्या विद्यार्थ्यांनी प्रथम पारितोषिक मिळविले. त्यांचा सत्कार डॉ. लहाने यांच्या हस्ते करण्यात आला. हातकाम, विणकाम प्रशिक्षणार्थी मारुती चितळे याला यदुनाथ थत्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.
डॉ. दादासाहेब गुजर पारितोषिक पवार यास, तर डॉ. वा. य. डोळे पारितोषिक कोमल गोरे हिला प्रदान करण्यात आले. अंजनाबाई कुंडलिक लहाने आदर्श स्वावलंबी पुरस्कार जयश्री आसाराम मायकर या अंध युवतीस देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिश्चंद्र सुडे यांनी केले. सूत्रसंचालन लक्ष्मी गुंडरे यांनी केले तर आभार कमलाकर बागवे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सतीश अष्टुरे, अहमद शेख,  बाळू कदम, यांनी परिश्रम घेतले.