ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज पाठिंबा जाहीर केला. शरद पवार यांच्या वक्तव्यामुळेच हे आंदोलन चिघळले असल्याची टिकाही त्यांनी केली.
राज्यघटनेने नागरिकांना आंदोलनाचा आधिकार दिला आहे. ते चिरडण्याचा सरकारला अधिकार नसल्याचे सांगून हजारे म्हणाले, आंदोलकांनी राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. या संपत्तीचे नुकसान झाले तर त्याची वसुली कर रूपाने आपणाकडून होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर खा. शेटटी यांनी सुरू केलेले आंदोलन योग्य असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील आंदोलनासाठी आपला यापुढील काळातही त्यांना पाठिंबा राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.