प्रतिष्ठित अशा विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (व्हीएनआयटी) खळबळ माजवून देणाऱ्या विनयभंग प्रकरणाला दोन महिने उलटले असले, तरी संस्थेला अद्याप संबंधित प्राध्यापकाविरुद्धची विभागीय चौकशी पूर्ण करता आलेली नाही. परिणामी या प्रकरणात आरोपी असलेले प्रा. श्रीराम सोनवणे यांच्यावर काहीही कारवाई झालेली नसल्याचा दावा या प्रकरणाची बळी ठरलेल्या विद्यार्थिनीच्या कुटुंबियांनी केला आहे.
प्रा. सोनवणे यांनी रासायनिक अभियांत्रिकी विभागातील दुसऱ्या सत्राच्या एका विद्यार्थिनीचा गेल्या ३ एप्रिल रोजी त्यांच्या चेंबरमध्ये विनयभंग केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी विद्यार्थिनीने अंबाझरी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता, परंतु पोलिसांनीही अद्याप याप्रकरणी काही कारवाई केलेली नाही. या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सेवानिवृत्त न्यायाधीश नेमण्यात आल्याचे संस्थेने म्हटले असले, तरी त्यांचे नाव मात्र जाहीर केलेले नाही. या न्यायाधीशांमार्फतची चौकशी अंतिम टप्प्यात असल्याचे संस्थेचे रजिस्ट्रार भास्कर गणवीर यांनी सांगितले. या न्यायाधीशांनी तक्रारकर्ते, आरोपी प्राध्यापक आणि साक्षीदार यांची निवेदने नोंदवली असून, इतर काही विद्यार्थी आणि अधिकारी यांच्याशीही त्यांनी संवाद साधला आहे. ते सर्वाना वैयक्तिकरित्या भेटल्यामुळे या प्रक्रियेला वेळ लागला, असे गणवीर म्हणाले.
विनयभंग पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी मात्र महाविद्यालयाचे प्रशासन संबंधित प्राध्यापकाला वाचवण्याचा आणि चौकशी लांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. आम्ही पूर्णपणे निराश झालो आहोत. संपूर्ण व्यवस्थाच आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना आमच्यासारख्या सामान्य लोकांना न्यायासाठीचा लढा सोडून देण्याशिवाय काही पर्याय नाही, असे ते हताशपणे म्हणाले. घटनेनंतर आजपर्यंत महाविद्यालयाचे अधिकारी किंवा पोलीस यांनी आमच्याशी संपर्क साधला नाही, किंवा आमच्याकडे काही चौकशी केलेली नाही; त्यामुळे त्यांच्या हेतूबाबत शंका येते. मुलीने प्रा. सोनवणे यांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करताना तिच्या मानेवर जे ओरखडे उमटले होते, ते वैद्यकीय तपासणीत दिसून आले. यापेक्षा आणखी काय जास्त पुरावा हवा, असा प्रश्न मुलीच्या एका नातेवाईकाने विचारला.
या प्रकरणाचा तपास सुरू असून, लवकरच आरोपपत्र दाखल केले जाईल, असे तपास अधिकारी असलेल्या अंबाझरी पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक सपना शिवणकर यांनी सांगितले. या प्रकरणातील विद्यार्थिनी आणि साक्षीदार यांचे बयाण नोंदवण्यासाठी मी बरेचदा महाविद्यालयात गेलेली आहे. तथापि, आरोपीला न्यायालयातून जामीन मिळाल्यामुळे आम्ही त्याला अटक करू शकत नाही, असे त्या म्हणाल्या.
दुर्दैवाने, प्रा. सोनवणे यांचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी काहीही प्रयत्न केले नसल्याचा दावा मुलीच्या पालकांनी केला. मात्र, हा जामीन रद्द करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे शिवणकर यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jun 2013 रोजी प्रकाशित
विनयभंग प्रकरणाची चौकशी रखडली
प्रतिष्ठित अशा विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेत (व्हीएनआयटी) खळबळ माजवून देणाऱ्या विनयभंग प्रकरणाला दोन महिने उलटले असले, तरी संस्थेला अद्याप संबंधित प्राध्यापकाविरुद्धची विभागीय चौकशी पूर्ण करता आलेली नाही. परिणामी या प्रकरणात आरोपी असलेले प्रा. श्रीराम सोनवणे यांच्यावर काहीही
First published on: 04-06-2013 at 09:29 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investigation gets stop of missbehave case