दुष्काळग्रस्त जनतेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे मदत केली जात आहे. जालना जिल्ह्य़ातील वाघलखेडा, वडीकाळ्या (अंबड), हसनाबाद (भोकरदन), पोखरी (जाफराबाद) येथे जनावरांसाठी मोफत चारा छावणी केंद्र सुरू करण्यात आले. दहिगव्हाण (घनसावंगी) येथे ३० हजार लिटरचा हौद तयार केला. सहा गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी ५ हजार लिटरच्या टाक्या दिल्या. पाच गावांमध्ये आणखी टाक्या देण्यात येतील. बीड जिल्ह्य़ातील आष्टी तालुक्यात १५ गावांचे सर्वेक्षण करून सुमारे ८५० गरजू कुटुंबांना ५५ टन धान्य देण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्य़ातील सिल्लोड तालुक्यात के ऱ्हाळे येथे जनावरांसाठी पाण्याचे दोन हौद केले. दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदतीसाठी उपेंद्र कुलकर्णी (नांदेड, ९४२१४७६२१५), सुरेश पाटील (लातूर, ९४२२०७२५१७), बाळकृष्ण खानवेलकर (औरंगाबाद, ९४२०९५८६५९), दीपक घाणेकर (जळगाव, ९४२३१८७४८०) यांच्याशी संपर्क साधावा.
संग्रहित लेख, दिनांक 7th Apr 2013 रोजी प्रकाशित
जनकल्याण समितीची दुष्काळग्रस्तांना मदत
दुष्काळग्रस्त जनतेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे मदत केली जात आहे. जालना जिल्ह्य़ातील वाघलखेडा, वडीकाळ्या (अंबड), हसनाबाद (भोकरदन), पोखरी (जाफराबाद) येथे जनावरांसाठी मोफत चारा छावणी केंद्र सुरू करण्यात आले. दहिगव्हाण (घनसावंगी) येथे ३० हजार लिटरचा हौद तयार केला.
First published on: 07-04-2013 at 12:03 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jankalyan committee help drought victims