पत्रकार हा समाजसुधारण्याचा प्रमुख कणा असल्याने स्वाभाविकच त्यामुळे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना प्रेरित अशी पत्रकारिता व्हावी हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार ए. व्ही. देशपांडे यांनी केले.
पाटण पत्रकार संघातर्फे पत्रकारदिनामित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साप्ताहिक कोयना कृपाचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार संपतराव देसाई होते. वृत्तपत्रे, सामाजिक जबाबदाऱ्या या विषयी ए. व्ही. देशपांडे, संपतराव देसाई यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात पत्रकार गणेशचंद्र पिसाळ, राजेंद्र साने, जितेंद्र मोळावडे, सुरेश संकपाळ यांच्यासह पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते.
प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक गणेशचंद्र पिसाळ यांनी केले, तर राजेंद्र साने यांनी आभार मानले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jan 2013 रोजी प्रकाशित
पत्रकार हा समाजसुधारण्याचा प्रमुख कणा- ए. व्ही. देशपांडे
पत्रकार हा समाजसुधारण्याचा प्रमुख कणा असल्याने स्वाभाविकच त्यामुळे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना प्रेरित अशी पत्रकारिता व्हावी हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार ए. व्ही. देशपांडे यांनी केले.
First published on: 09-01-2013 at 07:55 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journalism should be inspired by aacharya jambhekar a v deshpande