सहकाऱ्यासह चहा घेऊन रस्ता ओलांडून परत येत असताना मोटरसायकलने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन एकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास महात्मा फुले चौकात हा प्रकार घडला. क्रांतीचौक पोलिसांनी मोटारसायकलस्वाराविरुद्ध गुन्हा नोंदविला. सुभाष यलप्पा लंकेकर (वय ४८) असे मृताचे नाव आहे. लंकेकर व किसनप्रसाद कृषीत्तम उपाध्य हे जिल्हा परिषदेत काम करणारे दोघे जि. प. ते अंजली सिनेमागृहाकडे चहा घेण्यास गेले होते. चहा घेऊन परत येताना मोटरसायकलने लंकेकर यांना धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने लंकेकर यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.