तयार कपडय़ाच्या दुकानातून रोख रक्कम व कपडे असा २ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली.
मंगळवारी रात्री साडेनऊ ते बुधवारी दुपारी सव्वातीनच्या दरम्यान बंद दुकानातून ही चोरी झाल्याचे रूपेश अशोक कपाडिया (जवाहर कॉलनी) यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. कपाडिया यांचे जयभवानीनगर परिसरात ‘केसरिया’ नावाने तयार कपडय़ांचे दुकान आहे. दुकानाच्या पाठीमागील बाजूने वातानुकूलित यंत्रणा असलेल्या ठिकाणाहून चोरटय़ांनी दुकानात प्रवेश मिळविला. रोख ५० हजार रुपये, तसेच १ लाख ५९ हजार ५५० रुपये किमतीचे तयार कपडे असा ऐवज चोरटय़ांनी चोरून नेल्याची फिर्याद आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jul 2013 रोजी प्रकाशित
कापड दुकानातून दोन लाखांची लूट
तयार कपडय़ाच्या दुकानातून रोख रक्कम व कपडे असा २ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली.

First published on: 12-07-2013 at 01:49 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loot of 2 lakhs in cloth shop