शहर परिसरातील विविध संस्थांच्या वतीने गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सायंकाळी पाच वाजता गो. ह. देशपांडे उद्यान वाचनालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वाचनालयास भारत विकास परिषदेच्या वतीने काही दुर्मीळ झाडे भेट देण्यात येणार आहेत. पक्षीमित्र शेखर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, उद्यान वाचनालय प्रमुख देवदत्त जोशी यांनी केले आहे.
दुसरा कार्यक्रम सवरेदय मंडळ आणि सूतकताई मंडळ यांच्या वतीने दुपारी चार वाजता हुतात्मा स्मारक येथे सामूहिक सूतकताई आणि जाहीर व्याख्यान होणार आहे. गौतम भटेवरा या वेळी खादी विषयावर माहिती देणार आहेत. खादीचा प्रसार व प्रचार या माध्यमातून करण्यात येणार आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी मुकुंद दीक्षित (९८२३१०५४८५), वासंती सोर (८००७८५१३८१) यांच्याशी संपर्क साध्ण्याचे आवाहन केले आहे.