केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा केवळ नाशिक जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राला अभिमान आहे. महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहील, असे मनोगत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी येथे केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा नाशिक शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालेल्या मोनिका पांडे, हेमंत पाखले, महेंद्र पंडित, मानस गाजरे यांना दिवंगत राजीव गांधी स्मृती सन्मान चिन्ह देऊन सावंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष आ. जयप्रकाश छाजेड होते. भविष्यकाळात माहिती तंत्रज्ञानात विद्यार्थ्यांनी प्रगती करून या देशाचे नाव उज्ज्वल करावे तसेच भ्रष्टाचारमुक्त प्रशासन निर्माण करावे, अशी अपेक्षाही आ. छाजेड यांनी व्यक्त केली.
काँग्रेसच्या वतीने अशा प्रकारचा कार्यक्रम दरवर्षी घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शन शिबीरही घेणार असल्याचा मानस कार्यक्रमाचे आयोजक काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. आकाश छाजेड यांनी प्रास्तविकात व्यक्त केला. शहर काँग्रेसच्या कार्याचा आढावाही त्यांनी सादर केला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, विद्यार्थ्यांच्या वतीने मोनिका पांडे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश काँग्रेस सचिव अश्विनी बोरस्ते, महिला आघाडी शहराध्यक्षा वत्सलाताई खैरे, प्रदेश सरचिटणीस योगिता आहेर, नगरसेविका समिना मेमन आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 14th May 2013 रोजी प्रकाशित
‘युपीएससी’ गुणवंतांचा महाराष्ट्राला अभिमान- डी. पी. सावंत
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा केवळ नाशिक जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राला अभिमान आहे. महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहील, असे मनोगत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी येथे केले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा नाशिक शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
First published on: 14-05-2013 at 12:30 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra has pride over the upsc toppers d p savant