दिल्लीच्या भारतीय दलित साहित्य आकादमीतर्फे देण्यात येणाऱ्या महात्मा जोतिबा फुले राष्ट्रीय फेलोशिपने प्रा. डॉ. दिलीपकुमार कसबे यांना सन्मानित करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या हिंदी विभागाचे प्रपाठक असलेले डॉ. कसबे यांना हा सन्मान दिल्ली येथे अकादमीचे अध्यक्ष डॉ. सोहनपाल सुमनाक्षर यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या भारतीय दलित साहित्य अकादमीच्या २८ व्या राष्ट्रीय दलित साहित्यकार संमेलनात हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सतरावे बौध्द धर्मगुरू करमप्पा त्रिनले थाये दोर्जे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.