तरुणीला प्रेमपाशात ओढल्यानंतर तिचे लंगिक शोषण करून अश्लील चित्रफीत फेसबुकवर डाऊनलोड करण्याची धमकी देऊन त्या असहाय तरुणीस १० लाखाची खंडणी मागणाऱ्या एका तरुणास पोलिसांनी अटक केली. ललित उर्फ लल्ला अरुण गजभिये (२८,रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
उमरसरा परिसरातील एका १८ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लल्ल्याने गत दोन वर्षांंपासून तिचे लंगिक शोषण सुरू केले होते. त्याने या तरुणीची अश्लील चित्रफीतही तयार केली. या अश्लील चित्रफितीची व सीडीची धमकी देऊन आरोपीने पीडित तरुणीला त्रास देणे सुरू केले. नंतर आरोपीने तिला चक्क १० लाख रुपयांची मागणी केली. ती पूर्ण न केल्यास फेसबुकवर ही चित्रफीत डाऊनलोड करण्याची त्याने धमकी दिली.
या प्रकाराने घाबरलेल्या तरुणीने तिच्या  कुटुंबीयांना ही माहिती दिली. त्यानंतर वडगाव रोड पोलीस ठाण्याला या पीडित तरुणीने ललीत उर्फ लल्ल्या गजभियेविरुध्द तक्रार दिली. या प्रकरणी व माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.