चाळीसगावमधील रंगगंध कलासक्त न्यास संस्थेतर्फे गेल्या अकरा वर्षांपासून नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या स्मृतिनिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव आयोजित केला जातो. यावर्षी हा महोत्सव राज्यातील ११ शहरांत घेण्यात येणार असून त्याचा प्रारंभ ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबरला नागपुरात करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष मुकुंद करंबळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रारंभी या महोत्सवाची प्राथमिक फेरी राज्यातील विविध शहरात घेण्यात येणार असून अंतिम स्पर्धा ७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान चाळीसगावमध्ये घेण्यात येणार आहे. ३० ऑक्टोबर व १ नोव्हेंबरला नागपूरला, ७ व ८ डिसेंबरला सोलापूर (आराधना विश्वस्त मंडळ) आणि मुंबई (कोकण मराठी साहित्य परिषद), १४ व १५ डिसेंबरला कोल्हापूर (गायन समाज देवल क्लब), २१ व २२ डिसेंबरला नांदेड (रसिकाश्रय ग्रुप), २८ व २९ डिसेंबरला रत्नागिरी (जिज्ञासा थिएटर), ४ व ५ जानेवारीला पुणे (महाराष्ट्र कल्चरल सेंटर), १० जानेवारीला औरंगाबाद (अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद), ११ व १२ जानेवारीला नाशिक (लोकहितवादी मंडळ), १८ व १९ जानेवारीला धुळे (महाराष्ट्र साहित्य परिषद),२५ व २६ जानेवारीला जळगाव (म.जे. कॉलेज) या ठिकाणी स्पर्धा होणार आहे. प्रत्येक केंद्रातून पाच ते दहा स्पर्धकांची निवड केली जाणार आहे. हा महोत्सव स्पर्धात्मक असून कथा, कविता, आत्मवृत्त, नाटक, वैचारिक लेख किंवा कोणत्याही प्रकारच्या साहित्याचे वाचन करता येईल. स्पर्धक कलाकारांची संख्या किमान दोन तर जास्तीत जास्त पाच असावी. प्रत्येक प्रयोगाचा कालावधी हा ४० ते ५० मिनिटांचा आसावा. गेल्या काही दिवसात नाटकाच्या संहिता पाहिजे त्या प्रमाणात लिहिल्या जात नाही त्यामुळे या स्पर्धेच्या निमित्ताने नव्या संहिता लिहिण्याची आणि सादरीकरणाची त्यांना संधी आहे. या स्पर्धेतील चांगल्या संहिताची संस्थेतर्फे दखल घेण्यात येणार आहे. कुठल्याही नाटय़ संस्थेला व शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी सांघिक, वैयक्तिक आणि दिग्दर्शनासाठी रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहे.
नागपूरला रंजन कला मंदिरच्या सहकार्याने होणाऱ्या या महोत्सवाची प्राथमिक फेरी दोन दिवस होणार असून त्यात जास्तीत जास्त नवोदित कलावंतांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. विदर्भात नागपूरमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मधुरा टेंभूर्णीकर ८४४९९९८६४२ व श्रृती सपकाळे ९५०३३९९५६३ यांच्याशी संपर्क साधावा.
संग्रहित लेख, दिनांक 18th Oct 2013 रोजी प्रकाशित
पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृतीप्रित्यर्थ मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव
चाळीसगावमधील रंगगंध कलासक्त न्यास संस्थेतर्फे गेल्या अकरा वर्षांपासून नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या स्मृतिनिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव
First published on: 18-10-2013 at 09:08 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi literature festivalon a memory of purushottam daravhekar