इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या होणाऱ्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमास दैनिक ‘लोकसत्ता’ मुंबईचे उपसंपादक प्रसाद मोकाशी यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमास ‘उंच माझा झोका’ फेम मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पत्रकार दिनानिमित्त पत्रकार संघाच्या वतीने विविध क्षेत्रातील गुणवंतांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. त्यामध्ये जयहिंद मंडळाचा खो खोपटू योगेश मोरे, वस्त्रउद्योजक मेहबुब मुजावर, आनुहिरा महिला गृह उद्योगाच्या अंजना आमणे यांना सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमास आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर, प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, रोटरी क्लबचे अध्यक्ष रवींद्र नाकील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल आंबीव उपाध्यक्ष बसवराज पोटगी यांनी दिली.