जिल्ह्यातील कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी अडचणी येत आहेत. महादेव कोळी जातीचे दाखले मिळत नाहीत. या संदर्भातील जाचक अटी रद्द करून कोळी समाजास सुलभ पद्धतीने जात प्रमाणपत्र मिळावे, या मागण्यांसाठी अदिवासी कोळी अन्यायग्रस्त कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. कृती समितीचे अध्यक्ष अविनाश कोळी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने १८ मे रोजी काढलेले परिपत्रक रद्द करून कोळी समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात, समाजावरील अन्याय दूर करावा, या मागणीसाठी हा मोर्चा काढला होता. शहरातील लेडीज क्लब येथून निघालेल्या मोर्चात सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शहर पोलीस ठाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळामाग्रे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. सिद्धेश्वर कोळी, जि. प. च्या माजी अध्यक्षा गोदावरी केंद्रे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी सदस्य व कोळी बांधवांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jul 2013 रोजी प्रकाशित
महादेव कोळी समाजाच्या विविध मागण्यांवर
जिल्ह्यातील कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी अडचणी येत आहेत. जातीचे दाखले मिळत नाहीत. जाचक अटी रद्द करून कोळी समाजास जात प्रमाणपत्र मिळावे, या मागण्यांसाठी अदिवासी कोळी अन्यायग्रस्त कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.

First published on: 17-07-2013 at 01:56 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Morcha for demands by mahadeo koli samaj