नागपूरहून रेल्वेने मुंबई, पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना २५ जूनपासून साठ रुपये अतिरिक्त भाडे मोजावे लागणार असून ‘अच्छे दिन’चे स्वप्न पाहत असलेल्या प्रवाशांना त्यामुळे धक्का बसला आहे. पैशाची चणचण भासत असल्याचे सांगत रेल्वेने प्रवासी भाडय़ात १४.२ तर माल वाहतूक भाडय़ात ६.५ टक्के वाढ केली.
२५ जूनपासून ही भाडेवाढ अंमलात येणार असून आठशे कोटी रुपयांचा लाभ होईल, अशी रेल्वेला आशा आहे. २५ जूनपासून मुंबई, पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना साठ रुपये जास्तीचे प्रवास भाडे द्यावे लागणार आहे.
२५ जूनपासून नागपूरहून नवी दिल्लीला राजधानी एक्स्प्रेसने जाणाऱ्या प्रवाशांना प्रथम वातानुकूलित ३ हजार ७५० रुपये, द्वितीय वातानुकूलित २ हजार ३६० रुपये, तृतीय वातानुकूलित १ हजार ७०५ रुपये, तामीळनाडू एक्स्प्रेसने जाणाऱ्या प्रवाशांना प्रथम वातानुकूलित ३ हजार ३१० रुपये, द्वितीय वातानुकूलित १ हजार ९४० रुपये, तृतीय वातानुकूलित १ हजार ३८० रुपये, स्लीपर ५१५ रुपये, चेन्नईला तामिळनाडू एक्स्प्रेसने जाणाऱ्या प्रवाशांना प्रथम वातानुकूलित ३ हजार ३१० रुपये, द्वितीय वातानुकूलित १ हजार ९४० रुपये, तृतीय वातानुकूलित १ हजार ३५० रुपये, स्लीपर ५१५ रुपये, पुण्याला पुणे एक्स्प्रेसने जाणाऱ्या प्रवाशांना द्वितीय वातानुकूलित १ हजार ७१० रुपये, तृतीय वातानुकूलित १ हजार १९५ रुपये, स्लीपर ४५५ रुपये, हावडाला ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसने जाणाऱ्या प्रवाशांना प्रथम वातानुकूलित ३ हजार ४०० रुपये, द्वितीय वातानुकूलित १ हजार ९९० रुपये, तृतीय वातानुकूलित १ हजार ३८० रुपये, स्लीपर ५२५ रुपये, मुंबईला दुरांते एक्स्प्रेसने जाणाऱ्या प्रवाशांना प्रथम वातानुकूलित ३ हजार १७० रुपये, द्वितीय वातानुकूलित १ हजार ८५७ रुपये, तृतीय वातानुकूलित १ हजार २२० रुपये, स्लीपर ४८५ रुपये तर विदर्भ एक्स्प्रेसने जाणाऱ्या प्रवाशांना प्रथम वातानुकूलित २ हजार ७९० रुपये, द्वितीय वातानुकूलित १ हजार ६४५ रुपये, तृतीय वातानुकूलित १ हजार १५५ रुपये तर स्लीपरचे ४५५ रुपये भाडे द्यावे लागणार आहे.