विलेपाल्र्यात तीनदिवसीय कार्यक्रम
‘हृदयेश आर्टस्’ या संस्थेतर्फे ‘९व्या गानप्रभा संगीतोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. विलेपार्ले पूर्व येथील डहाणूकर महाविद्यालयाच्या घैसास ऑडिटोरियममध्ये २९ ते ३१ मे या कालावधीत दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता होणारा हा महोत्सव संगीतप्रेमींसाठी विनामूल्य आहे.
२९ मे या दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता पारितोष पोहनकर याच्या गायनाने संगीतोत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर शुभ्रनील सरकार (सतार) आणि सानिया पाटणकर (गायन) कला सादर करतील. दुसऱ्या दिवशी श्रुती भावे (व्हायोलिन), आदित्य मोडक (गायन) आणि ओजस अढिया (तबला एकल) हे कलाकार रंग भरणार आहेत. रविवारी कौस्तुभ गांगुली (गायन), निनाद मुळावकर (बासरी) आणि ओंकार दादरकर (गायन) यांच्या कलाविष्काराने या संगीतोत्सवाचा समारोप होईल. हा संगीतोत्सव तन्वी सामंत यांच्या स्मृतींना समर्पित करण्यात आला असून त्यांच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार व्हायोलिनवादक यज्ञेश रायकर तर उदयोन्मुख कलाकारांना देण्यात येणारा राघवेंद्र बेनगिरी पुरस्कार गायक व सरोदवादक आदित्य आपटे यांना देण्यात येईल. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक आनंद सिंग करणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 27th May 2015 रोजी प्रकाशित
संगीतप्रेमींना गानप्रभा संगीतोत्सवाची पर्वणी
‘हृदयेश आर्टस्’ या संस्थेतर्फे ‘९व्या गानप्रभा संगीतोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. विलेपार्ले पूर्व येथील डहाणूकर महाविद्यालयाच्या घैसास ऑडिटोरियममध्ये २९ ते ३१ मे या कालावधीत दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता होणारा हा महोत्सव संगीतप्रेमींसाठी विनामूल्य आहे.
First published on: 27-05-2015 at 08:08 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Musical programme in vile parle