धुळे येथे आयोजित नाशिक परीक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत नाशिक पोलीस आयुक्तालय संघाने सर्वसाधारण विजेतेपद मिळविले.
११० मीटर अडथळ्याच्या स्पर्धेत भूषण अनवट, गोळाफेकमध्ये प्रविण कदम, ज्युदोमध्ये विकास मराठे व तुषार माळोदे, वजन उचलण्याच्या स्पर्धेत शशीकांत बाबर, मयूर पवार, योगेश जाधव, प्रविण कदम, योगेश वायकंडे यांनी   प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविले. बास्केटबॉल संघातून अश्पाक शेख, जावेद शेख, प्रकाश शिंदे, गजानन पाटील, कय्युम सय्यद यांनी उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांक मिळवला. हँडबॉल संघातून राकेश बनकर, विशाल काठे, गिरीश महाले, संतोष उशीर आदींच्या चमकदार खेळामुळे नाशिकने विजेतेपद मिळविले. संघाने एकूण १०३ गुण मिळवित सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, उपायुक्त संदीप दिवाण यांनी खेळाडूंचा नियमित सराव घेवून त्यांना आवश्यक ते क्रीडा साहित्य वेळीच उपलब्ध करून दिले. तसेच वेळोवेळी मार्गदर्शन केले. सहाय्यक आयुक्त संदीप पालवे यांनी संघ व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. क्रीडाप्रनुख नायक अश्पाक शेख यांनी बास्केटबॉल, हँण्डबॉल, हॉकी या खेळात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सर्वसाधारण विजेतेपद मिळविण्यात मोलाचा सहभाग नोंदविला.