आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलावंत तयार करण्याच्या दृष्टीने लहानपणापासूनच मुलांना त्यांच्यातील प्रतिभेला आकार मिळावा यासाठी भारतीय विद्या भवन्स नागपूर केंद्राद्वारे पाच दिवसीय ‘नाटय़ महोत्सव’ उत्तर अंबाझरी मार्गावरील आयएमए सभागृहात आयोजित करण्यात आला.
सामाजिक समस्यांवर आधारित असलेल्या या नाटकांचे लेखन व निर्देशन विद्यालयाच्या शिक्षक-शिक्षिकांनी केले होते. ‘बाल दरबार’च्या तिसऱ्या दिवसाच्या नाटय़ सादरीकरणापूर्वी दिग्दर्शक संजय काशीकर, नाटय़कलावंत दीपा पत्की, सांची जीवने व भवन्स बी.पी. विद्या मंदिर, आष्टीच्या मुख्याध्यापिका वंदना बिसेन, डॉ. राजेंद्र चांडक व विजय ठाकरे यांनी रंगमंचाची पूजा केली. या महोत्सवात विविध ठिकाणच्या शाळांनी विविध विषयांवर नाटके सादर केली. यात स्कूल ऑफ स्कॉलर वानाडोंगरी, सी.डी.एस. स्कूल काटोल रोड, सेंट झेव्हियर्स हायस्कूल हिंगणा, शाहू गार्डन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मानेवाडा, सेंट जॉन्स हायस्कूल मोहननगर, अवधेशानंद पब्लिक स्कूल कामठी, एन.के. अकादमी कोराडी रोड या शाळांचा समावेश होता.