नवी मुंबई महानगरपालिकेचा २३ वा वर्धापन दिन १ जानेवारी रोजी विष्णुदास भावे नाटय़गृहात साजरा करण्यात येणार आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून महानगरपालिका दिनदर्शिका २०१५ चे प्रकाशन होणार असून प्रतिमा नवी मुंबईची या नवी मुंबईतील व्यावसायिक व हौशी छायाचित्रकरांसाठी आयोजित छायाचित्रण स्पध्रेचा बक्षीस समारंभ संपन्न होणार आहे. स्पध्रेतील पारितोषिक प्राप्त निवडक १२ छायाचित्रांचा समावेश या दिनदर्शिकेत करण्यात आला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने नव वर्षांची भेट म्हणून विविध सेवांची माहिती देणारे नवी अॅड्राईड अॅप्लिेकशन तयार केले असून त्यावर ऑनलाइन पालिकेची कर देयके भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच क्रीडा स्पर्धाचा पारितोषिक वितरण समांरभदेखील होणार आहे. नवी मुंबई शहराचा आयकॉन बनलेल्या महानगरपालिका मुख्यालय वास्तूप्रमाणेच शहारातील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, ऐरोली येथील दिवा कोळीवाडा चौक व इतर महत्त्वाच्या चौकात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या २३ वर्षांतील वाटचालीचा चित्रमय आढावा घेणारे लक्षवेधी प्रकल्प, मान्यताप्राप्त उपक्रम, लोकोपयोगी कामे यांचे माहितीपूर्ण प्रदर्शनेही छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सार्वजनिक प्रदर्शनी भागात प्रदर्शित करण्यात येणार आहे. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला नवी मुंबई नागरिकांनी मोठय़ा संख्यने उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर सागर नाईक आणि आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2014 रोजी प्रकाशित
नवी मुंबई महानगरपालिकेचा उद्या २३ वा वर्धापन दिन
नवी मुंबई महानगरपालिकेचा २३ वा वर्धापन दिन १ जानेवारी रोजी विष्णुदास भावे नाटय़गृहात साजरा करण्यात येणार आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून महानगरपालिका दिनदर्शिका २०१५ चे प्रकाशन

First published on: 31-12-2014 at 07:37 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai mahanagar palika celebrating anniversary