नवरात्रोत्सवात एकीकडे नारीशक्तीचा उदो उदो होत असताना लातूर रेल्वे स्थानकात मात्र लातूर-मुंबई एक्स्प्रेसच्या पार्सल डब्यात ९ महिन्यांच्या २ मुलींना कपडय़ात गुंडाळून बेवारस सोडून दिल्याची घटना उघडकीस आली.
गेल्या ७ ऑक्टोबरला रात्री साडेदहा वाजता हा प्रकार निदर्शनास आला. मुंबईला जाणाऱ्या रेल्वेच्या पार्सल डब्यात बेवारस बाळ असल्याची माहिती एका तरुणाने पोलिसांना दिली. पोलिसांनी दोन्ही बाळांना वैद्यकीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मुलींची एक्स रे व सोनोग्राफी तपासणी केल्यानंतर दोन्ही मुली कुपोषित असल्याचे आढळून आले. दोघींना शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सध्या ठेवण्यात आले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 11th Oct 2013 रोजी प्रकाशित
नऊ महिन्यांच्या जुळय़ा ‘नकोशी’ रेल्वेच्या डब्यात!
नवरात्रोत्सवात एकीकडे नारीशक्तीचा उदो उदो होत असताना लातूर रेल्वे स्थानकात मात्र लातूर-मुंबई एक्स्प्रेसच्या पार्सल डब्यात ९ महिन्यांच्या २ मुलींना कपडय़ात गुंडाळून बेवारस सोडून दिल्याची घटना उघडकीस आली.
First published on: 11-10-2013 at 01:38 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nine month twins nakoshi in railway aboard