सध्या इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा सुरू असून रविवार, १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आणि दुपारी ३ वाजता दोन विषयांची परीक्षा होणार आहे. परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये, त्यांना वेळेवर परीक्षेला जाता यावे म्हणून येत्या रविवारी मध्य, हार्बर तसेच पश्चिम रेल्वेवर केले जाणारे मेगाब्लॉक रद्द करण्यात आले आहेत.
बारावीच्या विद्यार्थ्यांची मेगाब्लॉकमुळे अडचण होऊ नये यासाठी तो रद्द करण्याची विनंती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली होती. रेल्वेने ही विनंती मान्य करून रविवार, १७ मार्च रोजी होणारे मेगाब्लॉक रद्द केले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 15th Mar 2013 रोजी प्रकाशित
बारावीच्या परीक्षेमुळे रविवारी तिन्ही रेल्वेमार्गाचा मेगाब्लॉक रद्द
सध्या इयत्ता बारावीची बोर्डाची परीक्षा सुरू असून रविवार, १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आणि दुपारी ३ वाजता दोन विषयांची परीक्षा होणार आहे.

First published on: 15-03-2013 at 12:17 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No railway mega block due to examination