ब्रीज या आंतरराष्ट्रीय खेळाविषयी सातत्याने विविध उपक्रम राबविणाऱ्या सांगली जिल्हा ब्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्रिंबकराव ऊर्फ पी. व्ही. जोशी यांची एकमताने निवड करण्यात आली. संस्थेच्या व्दि वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यामध्ये शंकुतला कुलकर्णी (उपाध्यक्ष), शाम फडणीस (कार्यवाह), महादेव काळे (खजिनदार), डॉ.अरुण जोशी (ज्येष्ठ सल्लागार) तसेच कार्यकारी मंडळात विलास चितळे, आनंद चिपळूणकर, माधवी करमरकर, सुहास फडणीस, अजित लिमये व संस्था प्रतिनिधी म्हणून मेदिनी जोशी व वसुधा आठवले यांचा समावेश आहे. या सभेत संस्थेच्या ३४ व्या वार्षिक अहवालाचे वाचन करण्यात आले.