डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या चहुबाजूंनी फेरीवाल्यांनी घुसखोरी केली आहे. रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार, पादचारी पुलावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे जवान रेल्वे स्थानकात फिरताना दिसतात. पण रेल्वेचे पादचारी पूल, जिने अडवून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करीत नाहीत. विष्णुनगर भागात रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार अडवून फळ विक्रेते बसतात. या विक्रेत्यांच्या बाजूला रेल्वे स्टेशन मास्तर बसतात. या सर्व अधिकाऱ्यांचे फेरीवाल्यांबरोबर संगनमत असल्याचे बोलले जाते. या सर्व प्रकाराची रेल्वे अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाने दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Aug 2014 रोजी प्रकाशित
डोंबिवली रेल्वे स्थानकात फेरीवाल्यांची घुसखोरी
डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या चहुबाजूंनी फेरीवाल्यांनी घुसखोरी केली आहे. रेल्वे स्थानकाचे प्रवेशद्वार, पादचारी पुलावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे.
First published on: 23-08-2014 at 06:28 IST
TOPICSफेरीवाले
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peddlers on dombivali station