मालेगाव विभागांतर्गत सायने येथील नवीन उच्चदाब उपकेंद्राच्या कामासाठी तसेच धुळे, मालेगाव व चाळीसगाव, मालेगाव उपकेंद्रातुन निघणाऱ्या वाहिनीचे काम करावयाचे असल्याने शुक्रवारी मालेगावसह सटाणा, कळवण परिसरातील वाहिन्यांवरील वीजपुरवठा सकाळी सहा ते रात्री आठपर्यंत बंद राहणार आहे.
मालेगाव विभागांतर्गत येणाऱ्या सायने उच्च विद्युत दाब नवीन उपकेंद्राचे काम प्रस्तावित आहे. या उपकेंद्रामुळे दहिवाळ परिसरातील कमी दाबाच्या वीजपुरवठय़ाविषयी तक्रार कायमस्वरूपी दूर होणार असून गोल्डननगर वाहिनीवर जो आयेशानगर वाहिनीचा अतिरिक्त भार आहे तो नवीन वाहिनीवर जोडल्याने त्या भागातदेखील सुरळीत वीजपुरवठा होणार आहे.
या उपकेंद्राची काही तांत्रिक कामे शुक्रवारी केली जाणार आहेत. यामुळे झोडगे, दाभाडी, अजंग, सायने, आझाद रावळगाव, दहिवाडा, चंदनपुरी, कळवाडी, सौंदाणे, पाटणे, करंजगव्हाण या भागात सकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत वीजपुरवठा राहणार नाही. या बाबतची माहिती वीज कंपनीने दिली आहे. तसेच महापारेषण कंपनी अतीउच्चदाब धुळे, मालेगाव व मालेगाव, चाळीसगाव वीज वाहिन्यांवर ओढण्याचे व टॉवर लाइनचे काम याच दिवशी करणार आहे.
त्यामुळे सटाणा व कळवण विभागातील अभोणा, दळवट, बेज, नांदुरी, चनकापुर, भऊर, खर्डा, ठेंगोडा, देवळा, बागलाण, महाल पाटणे, निंबोळा या भागातदेखील शुक्रवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित राहणार आहे. दुरुस्तीची कामे झाल्यानंतर सटाणा व कळवण परिसरातील ग्राहकांना योग्य दाबाने वीजपुरवठा होईल. वीज ग्राहकांनी या कामात सहकार्य करावे, असे आवाहन वीज कंपनीने केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th May 2015 रोजी प्रकाशित
मालेगाव, सटाणा, कळवणमध्ये आज वीजपुरवठा बंद
मालेगाव विभागांतर्गत सायने येथील नवीन उच्चदाब उपकेंद्राच्या कामासाठी तसेच धुळे, मालेगाव व चाळीसगाव, मालेगाव उपकेंद्रातुन निघणाऱ्या वाहिनीचे काम करावयाचे असल्याने शुक्रवारी मालेगावसह
First published on: 08-05-2015 at 08:13 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power off in malegaon satana and kalwan